मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती ( Police Bharti 2024) ला आजपासून सुरुवात होत आहे. आजपासून सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड सुरु होत आहे. हॉल तिकीट http://policerecruitment2024.mahait.org या वेबसाईटवर उपलब्ध झालेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पोलीस शिपाई, पोलीस बँड्समन, ड्रायव्हर पोलीस, SRPF, किंवा जेल पोलीस या ठिकाणी फॉर्म भरले असतील. पण विद्यार्थ्यांना एकाच दिवशी तारखा पडलेले आहेत. त्या बदलण्यासाठी त्यांना ग्राउंडच्या ठिकाणी जाऊन तारखे मध्ये बदल करून घेण्यात यावा असे परिपत्रक काढलेले आहे. मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2022 - 23 ची ही भरती आहे. आणि शासनाने विद्यार्थ्यांना वयाचे मर्यादा ही मार्च 2024 ठेवलेली होती. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान झालेले आहे. त्यामध्ये भरपूर विद्यार्थी या भरती पासून वंचित राहणार आहेत. प्रत्येकाचे स्वप्न असतं सरकारी नोकरी मिळावी. विद्यार्थी हे खेड्यापाड्यातून गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी भरतीला येत असतात. आणि त्यातल्या त्यात ग्राउंड्सच्या तारखा काढलेले आहेत. आणि त्यात पावसाळ्यामध्ये ग्राउंड घेतलेले आहेत. त्यामुळे यामध्ये विद्यार्थ्यांचा नुकसान होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की या ज्या तारखा आहेत त्या दोन महिने पुढे ढकलाव्यात. आणि यामध्ये दुसरी मागणी आहे की वय वाढ मिळावी. यासाठी विद्यार्थ्यांनी आमदार खासदार यांना निवेदन दिलेली आहेत. विद्यार्थ्यांनी आनंदवन बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी असं म्हटलं आहे की आम्हाला या भरतीमध्ये एक संधी द्यावी. त्यामुळे पोलीस भरतीचे वेळापत्रकामध्ये बदल होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. आणि आता सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निर्णयाकडे लागले आहे. |
0 Comments
Thanks for comment..