janral nolej question in Marathi pdf

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण janral nolej question in Marathi pdf मध्ये बघणार आहे. अत्यंत महत्त्वाचे असे 30 प्रश्न जे की तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोगी पडतील. सध्या स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानाला खूप महत्त्व आहे. त्यानुसार आपण हे प्रश्न घेतलेले आहेत. लेखाच्या शेवटी हे 30 प्रश्न तुम्हाला PDF स्वरूपात मिळतील तिथून तुम्ही हे प्रश्न डाऊनलोड करू शकता. आणि आपल्या मोबाईल मध्ये ही पाहू शकता. तसेच हे प्रश्न तुम्हाला आवडले तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या ब्लॉगला फॉलो करा.
janral nolej question in marathi pdf
janral nolej question in marathi pdf

janral nolej question in Marathi pdf


1. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली 'अमार सोनार बांगला' ही कविता बांगलादेशाचे राष्ट्रगीत कधी बनले?
उत्तर- 1971

2. गांधी विरुद्ध लेनिन हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर - एस.ए.डांगे.

3. कोणत्या व्हाईसरॉय चा संबंध 'ब्रेकडाऊन प्लान' शी संबंधित होता?
उत्तर- लॉर्ड रीडिंग.

4. भारतीय राष्ट्रीय गाण्याची पूर्ण धून वाजविण्यास किती वेळ लागतो?
उत्तर - 52 सेकंद

5. 'प्रॉब्लेम ऑफ ईस्ट ' या पुस्तकाचा लेखक असलेला व्हॉईसरॉय कोण?
उत्तर - लॉर्ड कर्झन

6. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी 'चलो दिल्ली' ही घोषणा कोणत्या देशात दिली होती?
उत्तर - सिंगापूर.

7. हिंदी स्वातंत्र्य संघ कोणी स्थापन केला?
उत्तर -राज बिहारी बोस

8. महाराष्ट्रात समाजकार्याचे प्रशिक्षण देणारी पहिली संस्था कोणती?
उत्तर- टाटा सामाजिक विज्ञान संस्था (मुंबई)

9. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा किती रुपये देण्यात येणार आहेत?
उत्तर - 1500

10. महाराष्ट्र राज्याचा 2024-25 अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत कोणी सादर केला?
उत्तर - अजित पवार 

11. महिला कसोटी Cricket मध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला?
उत्तर - शेफाली वर्मा

12. भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - विक्रम मिसरी

13. राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा करण्यात येतो?
उत्तर - 29 june 

14. केंद्रिय वाणिज्य मंत्रालयाद्वारे कोणता नवीन ई Platform सूरू करण्यात येणार आहे ?
उत्तर - trade Connect 

15. ग्लोबल पिस इंडेक्स 2024 नुसार भारत देश कितव्या स्थानावर आहे?
उत्तर - 116

16. Blue 🔵 Planet हा पुरस्कार 2024 कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर - IPBES

17. नुकतेच वर्गीस कोशी यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते ?
उत्तर - बुद्धिबळ स्पर्धा 

18. खालीलपैकी कोणत्या संस्थानाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून पंचायत राज पद्धतीचा पुरस्कार केला होता? 
उत्तर - औंध संस्थान. 

19. महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम...... मध्ये मंजूर झाला? 
उत्तर - 1961 

20. ग्रामसभेच्या वर्षातून किमान ........बैठका आमंत्रित करण्याचे बंधन सरपंचावर असते?
उत्तर - 06

21. हस्तलिखित विश्लेषणात्मक अभ्यास करणारे शास्त्र ........आहे ?
उत्तर - ग्राफोलॉजी

22. गरजांच्या क्रमवारी सिद्धांताच्या संकल्पनेचा जनक प्रणिता कोण? 
उत्तर - अब्रॉम म्यासलो 

23. 'प्रयत्न प्रमाद' या अध्ययन पद्धतीचा जनक खालीलपैकी कोण आहे?
उत्तर - थॉर्नडाइक. 

24. वनस्पती व प्राणी यांचा पर्यावरण संबंधात केलेला अभ्यासास काय म्हणतात?
उत्तर - इकॉलॉजी. 

25. आधुनिक शिक्षणाचा भारतात पाया कोणी रोवला?
उत्तर - ब्रिटिश

26. समाजशास्त्रामध्ये आत्महत्येचा सिद्धांत कोणी मांडला? 
उत्तर - इमाइल डुरखाईम 

27. मुंबईत पहिली गोदी कोणी बांधली? 
उत्तर - लवजी नसरवांजी वाडिया

28. ........... हे मुंबईतील पहिले वातानुकूलित सिनेमागृह होय? 
उत्तर - मराठा मंदिर 

29. वातावरणात विपुल प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य.......... हे होय? 
उत्तर - नायट्रोजन 

30. हृदयाकडून फुफ्फुसाकडे डीऑक्सिजेनेटेड रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यास....... म्हणतात?
 उत्तर - फुफुसरोहिणी

हे पण महत्त्वाचे पहा- पोलीस भरती प्रश्न उत्तरे



मित्रांनो janral nolej question in marathi वरती दिलेले प्रश्न तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून कळवा. हे प्रश्न तुम्हाला आवडले असतील तर आपल्या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहिजेत का आणखीन अवघड प्रश्न घ्यायचे तेही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.




Post a Comment

0 Comments