Janral nolej question in Marathi with answer pdf

 नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे Janral nolej question in Marathi with answer pdf या आजच्या आपल्या लेखामध्ये. मित्रांनो सध्या महाराष्ट्र पोलीस भरती चे ग्राउंड सुरू आहेत. सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड संपले की लगेचच लेखी परीक्षा तारखा पडतील. पोलीस भरतीमध्ये जितके  ग्राउंड ला महत्त्व आहे तितकेच लेखी परीक्षेला सुद्धा महत्त्व आहे. त्यासाठी आज आपण Janral nolej question in Marathi with answer pdf  तुम्हाला देणार आहे.या लेखाच्या शेवटी तुम्हाला प्रश्नांची PDF File मिळेल ते तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करू शकता. यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे पोलीस भरती मध्ये विचारले जाणारे पॉईंट त्यांचे प्रश्न व उत्तरे पाहायला मिळतील. हा लेख तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या ब्लॉगला फॉलो करा तसेच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Janral nolej question in Marathi with answer pdf
Janral nolej question in Marathi with answer pdf

1) महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे केव्हा पोहोचले?

 उत्तर- 5 एप्रिल 1930


2) केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था राज्यात……. या ठिकाणी आहे?

 उत्तर- सातपाटी रत्नागिरी.


3) भास्कराचार्य हे ज्योतिष शास्त्रज्ञ व गणितज्ञ असून त्यांनी……. हा ग्रंथ लिहिला?

 उत्तर- सिद्धांत शिरोमणी.


4) भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते?

 उत्तर- लॉर्ड माऊंटबॅटन.


5) पहिला पेशवा म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो?

 उत्तर- बाळाजी विश्वनाथ.


6) भारताची स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी कोणती?

 उत्तर- INSअरिहंत


7) 1919 मध्ये अखिल भारतीय खिलाफत परिषद…. येथे झाली?

 उत्तर- दिल्ली


8) खुदाई  खिदमतगार ही स्वयंसेवी संघटना…… यांनी सुरू केली?

 उत्तर- अब्दुल गफारखान. 


9) “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” ही गर्जना टिळकांनी कुठे केली?

 उत्तर- बेळगाव या ठिकाणी.


10) आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख कोण होत्या?

 उत्तर- डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन.


11) इंडियन वर्कर हे साप्ताहिक जर्नल कोणत्या कामगार संघटनेने प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली?

. उत्तर- इंटक.


12) भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केली?

 उत्तर- वॉरन हेस्टिंग.


13) रॅम म्हणजे काय?

 उत्तर- रँडम एक्सेस मेमरी.


14) जनाबाई यांचे जन्मगाव गंगाखेड हे कोणत्या जिल्ह्यात येते?

 उत्तर- परभणी


15) महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?

 उत्तर- पुणे


16) खालीलपैकी कोणत्या सदस्यांना पंच या नावाने ओळखले जाते?

 उत्तर- ग्रामपंचायत


17) ग्रामसेवक आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो?

 उत्तर- सीईओ कडे


18) दूर अंतरावरील वस्तू स्पष्ट व मोठ्या स्वरूपात पाहण्यासाठी….. या चा वापर करतात?

 उत्तर- टेलिस्कोप


19) मोबाईल मधील सिम कार्ड क्रेडिट कार्ड यांना…….. म्हणतात?

 उत्तर- स्मार्ट कार्ड


20) पंडित नेहरूंनी…… याला मजबूत ब्रेक असलेले पण इंजिन नसलेले यंत्र आहे असे म्हटले आहे?

 उत्तर- 1935 चा भारत सरकारचा कायदा.


21)  पश्चिम बंगालमध्ये कायम धारा पद्धत कोणी सुरू केली?

 उत्तर- लॉर्ड कॉर्नवालीस.


22) खालीलपैकी जालियनवाला बाग हत्याकांडात कोण जबाबदार होते?

 उत्तर- जनरल डायर.


23) 1953 च्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

 उत्तर- फाजल अली.


24) खालीलपैकी कोणत्या वर्षी ताश्कंद करारावर स्वाक्षऱ्या झाल्या?

  उत्तर- 1966

 हे पण पहा- जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे


25) इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया ची स्थापना कोणी केली?

 उत्तर- महादेव गोविंद रानडे.


26) मधुमेहावरील उपचारासाठी वापरले जाणारे इन्सुलिन प्राण्याच्या….. पासून मिळवले जाते?

 उत्तर- यकृत


27) महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम केव्हा मंजूर झाला?

 उत्तर- 1967


28) A एक काम 10 दिवसात करतो व B तेच काम 15 दिवसात करतो जर Aने चार दिवस काम केले व तो सोडून गेला तर उरलेले काम B किती दिवसात करेल?

 उत्तर-9


29) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी…… अलंकार ओळखा?

 उत्तर -उपमा


30) शब्दाच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो त्यास व्याकरणांमध्ये काय म्हणतात?

 उत्तर- वाक्य.


तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असे Janral nolej question in Marathi with answer pdf 30 प्रश्न आपण आज घेतलेले आहेत हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. असेच महत्त्वाचे प्रश्न आपण घेत असतो हा ब्लॉग तुम्हाला युजफुल वाटत असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांच्याही ज्ञानामध्ये भर पडेल आणि त्यांना त्यांचे ध्येय गाठण्यास मदत होईल. धन्यवाद. Post a Comment

0 Comments