Maharashtra Police Bharti 2024 : नवीन वर्षात राज्यात 13000 पोलिसांची पदभरती, लागा तयारीला!!

Maharashtra Police Bharti 2024 : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकदम आनंदाची बातमी आहे.पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या राज्यातील युवकांना नवीन वर्षांत चांगली बातमी आहे. महाराष्ट्र राज्य गृह विभागातर्फे नवीन वर्षात विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे. 13 हजार पदांची नवीन पोलीस भरती केली जाणार आहे. त्यानुसार गृह विभागाने नियोजन केलेले असून जे नवीन प्रशिक्षण पोलीस घेत होते त्यांचे प्रशिक्षण फेब्रुवारी अंती संपणार आहे. आता नवीन वर्षांत म्हणजेच 2024 मध्येही मेगा भरती होणार आहे. यापूर्वी लोकसभेच्या आचारसंहिता सुरू होण्याअगोदर पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते. अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे.

Maharashtra police bharti 2024

13 हजार पदांची नवीन पोलीस भरती

राज्यातील पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ पाहता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जून मध्ये गृह विभागाचा आकृतीबंध जीआर तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन पोलिस भरतीची किती गरज आहे याचा अंदाज घेतला जात आहे. 2011 च्या जनगणने नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,72,972 आहे. आणि लोकसंख्येनुसार भारताच्या उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येनंतर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य महाराष्ट्र आहे. त्यानुसार पोलीस भरती पडत आहे त्यामुळे पोलीस भरती करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या येत्या काळात खूप वाढली, पण पोलिस ठाणी आणि त्यानुसार पोलिसांचे जेवढे पाहिजे तेवढे मनुष्यबळ कमीच  असल्याची स्थिती आहे. 

गृह विभागाने आतापर्यंत एकूण 23 हजार पोलिसांची भरती पूर्ण केली आहे, तरी पण महाराष्ट्र पोलिस खात्याला अजून मनुष्यबळ कमीच पडत आहे. नवीन आकृती बंधामुळे आता राज्यातील हजारो युवकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे नवीन प्रस्तावित आकृती बंधानुसार महाराष्ट्र गृह विभागाकडून भरती जाहीर होईल, असे सूत्रांनी सांगितले.

फेब्रुवारी अगोदर भरती होणार !!

पोलीस भरती होणार आहे ही आनंदाची बातमी आहे. पण मागच्या दोन वर्षात कोरोना मुळे भरती झालेली नाही. त्यानंतर 2023 मध्ये जंबो भरती करण्यात आली होती. पण कोरोणाच्या काळात अनेक विद्यार्थ्यांची वय हे उलटून गेलेली आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे नुकसानच आहे. याचा विचार सरकारकडून करण्यात यावा ही मागणी करण्यात येत आहे. नक्कीच सरकारने याचा विचार करावा आणि वय वाढवून द्यावे. फेब्रुवारीमध्ये नवनियुक्त पोलिसांचे प्रशिक्षण संपणार आहे. त्यापूर्वी नवीन पोलीस भरती केली जाणार आहे. त्यामुळे गाफील न राहता पोलीस भरती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तयारी सुरू केली पाहिजे.

Post a Comment

0 Comments