आधुनिक भारताचा इतिहास- ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इतिहास

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी -  

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 साली झाली. सुरुवातीला फक्त व्यापारात लक्ष घालणाऱ्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात आल्यानंतर प्रथम पोर्तुगीज नंतर डच व शेवटी  फ्रेंच बरोबर संघर्ष करावा लागला. या तिघांचाही बंदोबस्त केल्यानंतर ब्रिटिशांनी आपले लक्ष  इतरांकडे  वळवले.  दक्षिण भारतात कर्नाटकच्या गादिवरून मोहम्मद अली आणि चंदासाहेब यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. फ्रेंच यांनी चंदा साहेबांची तर ब्रिटिश यांनी मोहम्मद अली ची बाजू घेतली.  त्यानंतर झालेल्या संघर्षात चंदा साहेबाचा पराभव होऊन त्याला ठार करण्यात आले.  त्यामुळे फ्रेंच यांना धक्का बसला तर मोहम्मद अली चा विजय झाल्यामुळे ब्रिटिशांना व्यापारी सवलती मिळाल्या.


औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (1707) भारतातील बहुतेक सर्व सुभेदारांनी आपले स्वातंत्र्य जाहीर केले. हैदराबादच्या निजामाने सुद्धा आपले स्वातंत्र्य जाहीर केले निजामाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा नासीरजंग आणि नातू मुजफ्फर जंग यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. ब्रिटिशांनी नासीरजंग ची तर फ्रेंच यांनी मुजफ्फर ची बाजू घेतली. या संघर्षातही ब्रिटीशांचा विजय झाला मैसूरचा नवाब हैदरअली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाल्यामुळे पहिले एंग्लो म्हैसूर युद्ध सुरू झाले. 1769 मध्ये ब्रिटीशांचा पराभव झाला. हैदरअली इसवी सन 1782 मध्ये मरण पावला, त्याचा मुलगा टिपू सुलतान याने ब्रिटिशां बरोबरचा संघर्ष चालू ठेवला. 1784 च्या लढाईत इंग्रजांनी टिपू सुलतानचा बंदोबस्त केला. टिपू सुलतानणे युद्धाची पूर्ण तयारी करून इंग्रजांबरोबर चा संघर्ष चालू ठेवला शेवटी श्रीरंगपट्टनम च्या लढाईत टिपू सुलतान चा इंग्रजांनी पराभव केला.

इंग्रजांनी अशाप्रकारे दक्षिणेत प्रथम निजाम आणि त्यानंतर टिपू सुलतान चा बंदोबस केल्यानंतर आपले लक्ष मराठ्यांकडे वळविले.  मराठ्यांचा पानिपतच्या तिसऱ्या लढाईत संपूर्ण पाडाव झाल्यानंतर, इ.स. 1761 भारतात खऱ्या अर्थाने सत्तेची पोकळी निर्माण झाली होती.  ब्रिटिशांनी ती भरून काढली ब्रिटिशांनी भारत मोगलांकडून जिंकून घेतलेला नसून मराठ्यांकडून जिंकून घेतलेला आहे हे ऐतिहासिक सत्य आहे. या संघर्षाची सुरुवात मराठ्यांच्या अंतर्गत यादवी पासून झाली. पानिपतच्या पराभवाचा धक्का सहन न झाल्यामुळे तिसरे पेशवे नानासाहेब इसवी.सन 1761 मध्ये मृत्युमुखी पडले. थोरले माधवराव पेशवे पेशवे बनले.  परंतु राघोबादादांना ते सहन झाले नाही पेशव्यांच्या कुटुंबात सत्तेसाठी अंतर्गत कलह निर्माण झाला राघोबादादा ब्रिटिशांना येऊन मिळाले. ब्रिटिशांनी या संधीचा फायदा घेऊन राघोबादादास  आश्रय दिला. 1782 मध्ये   सालबाईचा तह होऊन सलीसट्टीचा प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात आला. 


त्यानंतर मराठ्यांनी ब्रिटिशाबरोबर युद्ध करून त्यांचा पराभव केला. परंतु ब्रिटिशांनी या पराभवाचा सूड दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करून (१८०२ ) काढला.  वसईच्या तहानुसार ( १८०२ ) मराठ्यांना तैनाती फौज स्वीकारणे भाग पडले.  त्यानंतर काही काळ मराठेशाही अस्तित्वात राहिली. परंतु इंग्रजांनी मराठ्यां बरोबर शेवटचा संघर्ष करून तिसऱ्या युद्धात १८१८  मध्ये दुसर्‍या बाजीरावाचा संपूर्ण पाडाव केला.  अशाप्रकारे मराठेशाही नष्ट झाली.

यानंतर ब्रिटिशांनी आपले लक्ष बंगालमध्ये केंद्रित केले बंगालचा नवाब अलीवर्दीखान इसवी.सन १७५६ मध्ये मरण पावला.   त्याचा नातू सिराज उद्दौला बंगालचा नवाब बनला.   सीराजच्या मनात ब्रिटिशां बद्दल फारसे प्रेम नव्हते. कोलकात्यातील श्रीमंत सावकार जगत शेठ  यांच्यामार्फत  ब्रिटिशांनी सिराज चा सरसेनापती मिर जाफर यांच्याबरोबर संधान साधले.  मीरजाफर ब्रिटीशांना फितूर झाला त्यानंतर  प्लासी येथे झालेल्या लढाईत  ब्रिटिशांनी सिराज उद्दौलाचा पराभव करून त्याला ठार मारले व मीर जाफर बंगालचा नवाब बनला.


प्लासीच्या लढाई ला  भारताच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.  या लढाईतील  यशामुळे  बंगाल, बिहार,ओरिसा या भागात ब्रिटिशांचे वर्चस्व निर्माण झाले. बंगालचा नवाब ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातील कळसूत्री बाहुले बनला.  बंगालचा गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह याने नवाबाकडून फार मोठ्या प्रमाणात सवलती आणि पैसे मिळवले.  सतत पैशाची मागणी पुरविता न आल्यामुळे  मिर जाफर अस्वस्थ बनला.  ब्रिटिशांनी त्याला नवाब पदावरून काढून टाकले आणि त्याचा जावई मीर कासीम याला नवाब बनविले. 


मीर कासिम अतिशय महत्त्वाकांक्षी नवाब होता प्रशासनातील ब्रिटिशांचा हस्तक्षेप त्याला मानवत नव्हता. त्याने हळूहळू ब्रिटिशांविरुद्ध कारवाया करण्यास सुरवात केली. त्यासाठी त्यांनी अयोध्येचा नवाब सुजाउदौला आणि मोगल बादशहा शहा आलम यांची मदत घेण्याचे ठरविले. अशाप्रकारे युद्धाची पूर्वतयारी झाल्यानंतर बक्सार येथे इ.स. 1764 मध्ये ब्रिटिश आणि मीर कासीम यांची लढाई झाली. या युद्धात मीर कासीम सुजाउदौला व शाह आलम यांच्या संयुक्त फौजांचा ब्रिटिशांनी पराभव केला. बक्सार च्या लढाईमुळे खऱ्या अर्थाने ब्रिटीश राजवट भारतात सुरू झाली. 1765 पासून रॉबर्ट क्लाइव्ह ने बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली. जमीन महसूल वसूल करण्यासाठी नायब नवाब नेमले.  राज्यकारभाराची सर्व जबाबदारी  नवाबावर सोपविण्यात आली तर सत्ता पूर्णपणे ब्रिटिशांच्या ताब्यात देण्यात आली.  त्यामुळे शासन व्यवस्थेत गोंधळ निर्माण झाला जनतेवरील अन्यायाला पारावार उरला नाही. ब्रिटिश व्यापारी उर्मटपणे वागू लागले बंगाल बिहार मध्ये  अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिशांनी या वेळी वेगवेगळ्या मार्गाने प्रचंड प्रमाणात जनतेची लूट केली. रॉबर्ट क्लाइव्ह नंतर वॉरन हेस्टींग बंगालचे गव्हर्नर बनले. त्यांनी अनेक प्रशासकीय सुधारणा केल्या सदर दिवाणी अदालत आणि सदर निजामी अदालत ही न्यायालय सुरू केली. मराठ्यांबरोबर युद्ध करून सालबाईचा तह केला. त्यामुळे वसई पासून मुंबई पर्यंतचा प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात आला.  हेस्टींग च्याकारकीर्दीत नंदकुमार, अयोध्येचा बेगम इत्यादी प्रकरणे झाली.  हेस्टींग काळात रेग्युलेटिंग एक्ट हा कायदा ब्रिटिश संसदेने पास केला. 


वॉरन हेस्टींग नंतर लॉर्ड कॉर्नवालीस हे गव्हर्नर जनरल बनले.  त्यांनी 1793 मध्ये कायमधारा पद्धत सुरू करून महसूल व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडून आणला. बंगाल व बिहार मध्ये सुरू केलेल्या जमीन महसुलाच्या पद्धतीमुळे जमीनदारां चा एक नवा वर्ग उदयास आला.  ब्रिटिशांना 45 ते 55 टक्के जमीन महसूल वसूल होऊ लागला पण शेतकऱ्यांचे  मात्र खूपच हाल झाले दुष्काळात जमीन महसूल भरण्यासाठी त्यांना  आपल्या जमिनी जमीनदारांना विकाव्या लागल्या. मद्रास आणि महाराष्ट्रात रयतवारी पद्धत सुरू झाली. या पद्धतीत सावकारांनी शेतकऱ्यांचे शोषण केले. सावकारांच्या या शोषणाचा परिणाम 1875 मध्ये महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी बंड  पुकारले शेतकऱ्यांचा हा उद्रेक कंपनी सरकारने अतिशय क्रूरपणे दडपून टाकला.


हे पण एकदा वाचा -- आधुनिक भारताचा इतिहास : 1857 चे स्वातंत्र्य युद्ध व कारणे gkspmpsc.com   



Post a Comment

0 Comments