Maharashtra Police bharti 2024 news : महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. जे उमेदवार एक ते दोन सेंटीमीटर साठी उंची मध्ये पोलीस भरती मध्ये बाहेर पडत आहेत. त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. पण ही सूट कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे आणि ती कशा संदर्भात आहे. याची सविस्तर माहिती आपण पुढे बघणार आहोत.
Maharashtra Police bharti 2024 news |
खेड्यापाड्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून धडपडत असतात. ग्राउंड,लेखी ची तयारी करत असतात. पण हे सर्व करून सुद्धा शेवटी ते उंची मध्ये बाहेर पडतात. आणि सर्वात जास्त दुःख तेव्हा होते जेव्हा उंचीमध्ये विद्यार्थी बाहेर पडतात. उंची मध्ये बाहेर पडण्याचे दुःख हे एका पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यालाच माहीत असते.
आजची ही महत्त्वाची अपडेट आहे ती पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. राज्य शासनाने पोलीस भरती मध्ये पाच सेंटीमीटर ची सूट देण्याची घोषणा केलेली आहे. पण ही सूट सरसकट सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू नाही. ही जी सूट देण्यात आलेली आहे ती आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागू केलेली आहे. एसटी ST कॅटेगिरी मध्ये येणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी ही पाच सेंटीमीटर ची सूट देण्यात आलेली आहे. एसटी कॅटेगरी मधले जे उमेदवार एक ते दोन सेंटीमीटर साठी उंची मधून बाहेर पडत होते. त्यांच्यासाठी ही सूट दिलेली आहे.
याबाबतचा जीआर GR राज्य शासनाने 4/9/2024 रोजी पारित केला आहे. ज्याप्रमाणे केंद्र शासनाने आपल्या केंद्राच्या भरत्यांमध्ये एसटी कॅटेगरी साठी उंची मध्ये सवलत दिलेली आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनाने सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सूट दिलेली आहे. या निर्णयाचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही सूट देऊन आदिवासी समाजाला न्याय दिलेला आहे.
Maharashtra Police शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल यामध्ये सुधारणा नियम 2012 यात आणखी सुधारणा करण्यात आली. आणी आता या नियमास Maharashtra Police शिपाई सेवा प्रवेश नियम 2024 असे संबोधले जाणार आहे. आणि आता येणाऱ्या पोलीस भरती पासून ही सवलत लागू केली जाणार आहे.
0 Comments
Thanks for comment..