Talathi Syllabus PDF in Marathi | महाराष्ट्र तलाठी भरती परिक्षा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप

Talathi Syllabus PDF in Marathi : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षा तुमच्यापैकी बरेच जण तलाठी भरती परीक्षेचा अभ्यास करत असाल, आणि असे पण काही विद्यार्थी असतील की जे नवीन अभ्यासाला सुरुवात करणारे असतील. पण त्यांना अभ्यासाला सुरुवात कुठून करावी, आणि या तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो? परीक्षेच्या स्वरूप काय असते ?हेच माहीत नसते. म्हणून आजच्या पोस्टमध्ये आपण तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप, तसेच अभ्यासक्रम पीडीएफ स्वरूपात घेऊन आलेलो आहोत.

talathi syllabus pdf in marathi, तलाठी पदाची थोडक्यात माहिती :- 


तलाठी हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील शासनाचा कर्मचारी आहे. गावातील जमिनी संबंधीची अभिलेख सतत अद्ययावत राहावीत म्हणून तलाठी कार्यालयात अनेक प्रकारच्या वह्या नोंदवह्या विहित करण्यात आलेले आहेत. गाव पातळीवरील नोंदवहयांचे दप्तर 1 ते 21 क्रमांकाच्या गाव नमुन्यामध्ये ठेवण्याचे काम तलाठी हा करत असतो. गावातील लोकांना लागणारा शेतजमिनीचा 7/12, 8 अ या सर्व बाबी तलाठी देत असतो. आजच्या या लेखात आपण talathi syllabus pdf in marathi मध्ये पाहणार आहोत.

talathi syllabus pdf in marathi
तलाठी हे महसूल खात्यातील वर्ग 3 चे पद असून परीक्षेमध्ये एकूण चार घटकांचा समावेश होतो. मराठी इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता. या चार विषयांचा तलाठी भरती परीक्षा मध्ये समावेश होतो. तसेच ही परीक्षा एकूण दोन तासांची असते. आणि ही परीक्षा टीसीएस मार्फत घेतली जाते.

1 ) English Language - 
ENGLISH Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, ,Narration, Tense, Voice, , Article, Punctuation,Question Tag)

Vocabulary (Use of Phrases and Idioms and their meaning, Expressions)
Fill in the blanks, in the sentence
Simple Sentence structure (Error, Types of Sentence)

2 ) मराठी भाषा
मराठी व्‍याकरण (समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द वाक्‍यरचना,प्रयोग, शब्‍दार्थ, , समास, )प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक,म्‍हणी व वाकप्रचार, वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह

3) सामान्य ज्ञान
इतिहास, भारताची राज्यघटना,भूगोल, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणक संबंधित प्रश्न) आणि जनरल नॉलेज 

4) बौद्धिक चाचणी बुद्धिमत्ता –  अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, अंकमालिका, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वेन आकृती, वाक्यावरून निष्कर्ष
अंकगणित –  गुणाकार, भागाकार,बेरीज, वजाबाकी, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज.

तर मित्रांनो वर दिल्याप्रमाणे तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आहे. कोणत्याही परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा अभ्यासक्रम पहिला समजून घ्यायला पाहिजे. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितले पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची काठीनता समजून येते. 

Post a Comment

0 Comments