Indian Freedom Movement | भारतीय स्वातंत्र्य चळवळ

                                        Indian Freedom Movement भारतीय स्वातंत्र्य चळवळ

Indian Freedom Movement | भारतीय स्वातंत्र्य चळवळ

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी व 20 व्या शतकाच्या प्रारंभी भारतात अनेक राजकीय चळवळी सुरू झाल्या. त्यापैकी काही चळवळीचा हेतू साध्य झाला तर काही चळवळी अल्पशाणे यशस्वी झाल्या तर काही चळवळींना थोडीही यश आले नाही. मात्र (Indian Freedom Movement)भारतीय स्वातंत्र्य चळवळ प्रत्येक चळवळीला स्थल काळाच्या संदर्भात ऐतिहासिक महत्त्व होते. प्रदीर्घकाळ चाललेल्या या स्वातंत्र्य चळवळीत अनेक चळवळींचा समावेश होतो.

उदा - भूमिगत चळवळ,होमरूल चळवळ, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि चलेजाव चळवळ हि राष्ट्रीय चळवळीची सुरुवात भारतातील राजकीय घटनांमुळे होऊ शकली. सुरुवातीला राजकीय जागृती बंगालमध्ये झाली. कारण तेथेच इंग्रजी राजवटीची आणि इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली. राष्ट्रीय काँग्रेसची सुरुवात इंग्रज अधिकारी ॲलन ह्युम या सनदी अधिकाऱ्याने केली. इ.स 1885 मध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय सभेचे अधिवेशन मुंबई येथे भरविण्यात आले होते. काँग्रेसच्या मागण्यांचे पुढे राष्ट्रीय चळवळीत रूपांतर झाले. 

(होमरूल चळवळ 1916)

राष्ट्रीय चळवळीचा जोर देशभर पसरत राहिला. व्हॅलेंटाईन चीरोल यांनी टिळकांना "भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले आहे" टिळकांच्या राष्ट्रीय चळवळीतील दुसरी चळवळ म्हणजे "होमरूल चळवळ" ही होय या चळवळीची सुरुवात आयर्लंड मध्ये झाली होती. इंग्लंडच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी तिथे होमरूल चळवळ सुरू करण्यात आली होती. डॉक्टर Anny बेझंट यांनी ती भारतात आणली. टिळकांनी या चळवळीला आपला पाठिंबा दिला होता. पहिली होमरूल समिती टिळकांनी महाराष्ट्रात स्थापन केली. या चळवळीने अंतर्गत भारतीयांना स्वायत्ता देण्यात यावी अशी मागणी केली होती. परंतु ब्रिटिशांनी ती मान्य केली नाही. पहिले महायुद्ध चालू असल्यामुळे सरकार विरोधी आंदोलन फारसे तीव्र करता आले नाही. सरकारला होमरूल चळवळ दडपून टाकण्यात यश आले. सन 1920 मध्ये लोकमान्य टिळक हे मरण पावले. त्यामुळे टिळक युगाचा अस्त झाला आणि गांधी युगाची सुरुवात झाली.


(स्वदेशी चळवळ 1905)

लोकमान्य टिळकांनी 1905 मध्ये स्वदेशी चळवळ सुरू केली होती. या चळवळीचे स्वरूप आर्थिक तत्त्वावर आधारित होते. इंग्लंड हे बनियाचे राष्ट्र आहे. याची नेपोलियन प्रमाणेच टिळकांना माहिती असल्यामुळे त्यांनी ब्रिटिशांचा भारतातील व्यापार कमी होण्यासाठी स्वदेशी चळवळ सुरू केली. परदेशी मालावर बहिष्कार स्वदेशी वस्तूंचा वापर स्वराज्य व राष्ट्रीय शिक्षण ही या चळवळीची चतुसुत्री होती.


 (वंगभंग विरोधी चळवळ 1905)

लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी बंगालची फाळणी केली. या फाळणीला विरोध करण्यासाठी बंगालमध्ये वंगभंग चळवळ सुरू झाली. तिला लोकमान्य टिळकांनी आपला पाठिंबा दर्शविला. तर स्वदेशी चळवळीला बंगालमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. अशाप्रकारे स्वदेशी चळवळ व वंगभंग चळवळ या दोन्ही एकत्र झाल्यामुळे देशात इंग्रजांविरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण झाला.


गांधीजींचा सत्याग्रह -

गांधीजींचा सत्याग्रह

गांधीजींच्या लढ्याचे सूत्र हे शांततेच्या मार्गाने चळवळ करणे अन्यायाचा प्रतिकार करणे. त्यासाठी तुरुंगवास सोसावे लागले तरी आनंदाने सोसायचे हे होते. महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत गोऱ्या लोकांच्या सरकारच्या वर्ण द्वेषाच्या धोरणाविरुद्ध सत्याग्रह केला होता. 

Indian Freedom Movement "भारतीय स्वातंत्र्य चळवळ" अहिंसा असहकार आणि उपोषण या शस्त्रांचा वापर करून ब्रिटिश सत्तेला अनोख्या मार्गाने आव्हान दिले गांधीजींचे राजकारण हे अध्यात्मिक तत्त्वावर आधारलेले राजकारण होते. स्त्रियांना राजकारणात सहभागी करून घेणारे महात्मा गांधी हे पहिले पुढारी होते.


(चंपारण्य सत्याग्रह 1917)

महात्मा गांधीजींनी बिहार मधील "चंपारण्य" येथे सत्याग्रहाचा यशस्वी प्रयोग केला होता. तेथे निळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा चालू होता. हे सर्व मळे ब्रिटिशांच्या मालकीचे होते. गांधीजींनी शेतकऱ्यांचे नेतृत्व करून त्यांचा लढा यशस्वी केला. खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ही गांधीजींनी नेतृत्व केले. व मजूर महाजन संघ स्थापून अहमदाबाद येथे गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवले.


(जालियनवाला बाग हत्याकांड 1919)

राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी सरकारने 1919 रोजी रोलेट कायदा आणला होता. या कायद्याने कोणत्याही व्यक्तीला राजद्रोहाच्या संशयावरून विना चौकशी तुरुंगात डामण्याचा अधिकार इंग्रज सरकारला मिळाला.या कायद्याने अपील करण्याची ही परवानगी नाकारली. म्हणून या कायद्याला "काळा कायदा" असे संबोधून हिंदी जनतेने त्याचा निषेध केला. सहा एप्रिल 1919 हा रोलेट कायद्याचा निषेध दिन पालुन गांधीजींनी आव्हान केले, या कायद्याविरुद्धचे आंदोलन पंजाब मध्ये तीव्र होऊ लागले. 

13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरला जालियनवाला बागेत झालेल्या सभेवर जनरल टायरच्या हुकुमाने अमानुष गोळीबार केला गेला. बंदुकीच्या सोळाशे फैरी झाडण्यात आल्या. सभेचे ठिकाण चोहोबाजूंनी बंदिस्त होते त्यामुळे बाहेर पडण्यास एक अरुंद बोळ होता. जनरल डायर या अधिकाऱ्याने या सभेवर गोळीबार केला. शेकडो स्त्री पुरुष या हत्याकांडात मारले गेले. यावेळी ओडवायर हे पंजाबचे गव्हर्नर होते उधमसिंह यांनी 1940 रोजी ओडवायरचा लंडन येथे खून करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला. या घटनेचा निषेध म्हणून टागोरांनी सर या पदवीचा त्याग केला.


(असहकार चळवळ 1920 - 1922)

अन्याय करणाऱ्या सरकार बरोबर कोणत्याही परिस्थितीत सहकार्य करायचे नाही. त्यांची नोकरी करायची नाही त्यांच्या शाळा महाविद्यालयात शिकायचे नाही,त्यांच्या न्यायालयात वकिली करायची नाही, स्वदेशी वस्तूंचा वापर करायचा परकीय मालावर बहिष्कार टाकायचा, अशा सहकार चळवळीचा कार्यक्रम देशभर 1920 पासून सुरू करण्यात आला. 4 सप्टेंबर 1920 मध्ये लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या काँग्रेसच्या खास अधिवेशनात गांधीजींनी मांडलेला असहकार चळवळीचा कार्यक्रम मान्य झाला. ही चळवळ देशभर सुरू झाली 25000 कार्यकर्ते तुरुंगात गेले. काही ठिकाणी गोळीबार झाले.

सतत दोन वर्षे ही चळवळ चालू होती. जमावाने "चौरी चौरा" येथे एका पोलीस ठाण्यास आग लावली. त्या आगीत एक अधिकारी व 21 पोलीस ठार झाले. या हिंसक प्रकाराने गांधीजी व्यथित झाले. त्यांनी फेब्रुवारी 1922 रोजी आंदोलन मागे घेतले. गांधीजींच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या पहिल्या देशव्यापी चळवळीत पुढील प्रकारे निषेध नोंदविण्यात आला. स्वदेशी वस्तूचा वापर व प्रसार परदेशी वस्तूंवर बहिष्कार, सरकारी सभा समारंभावर बहिष्कार, सरकारी शाळा कॉलेजवर बहिष्कार, सरकारी न्यायालयांवर बहिष्कार, कायदे मंडळाच्या निवडणुकांवर बहिष्कार, सरकारने दिलेल्या पदव्या पदके यांचा त्याग.

सी. आर. दास, पंडित मोतीलाल नेहरू, वल्लभभाई पटेल लाला लजपतराय इत्यादींनी Indian Freedom Movement या चळवळीत वकिली सोडली. या चळवळी नंतर गांधीजींनी राष्ट्रीय लढ्याला पूर्णता आणण्यासाठी दलितांचा उद्धार करणे. अस्पृश्यतेचा कलंक नाहीसा करणे, स्वदेशीचा प्रसार करणे हिंदू मुसलमान एक्यासाठी प्रयत्न करणे. राष्ट्र राष्ट्रभाषेचा प्रचार करणे इत्यादी विधायक कार्यक्रम राबवले.


You may Also Like - आधुनिक भारताचा इतिहास- ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इतिहास

Post a Comment

0 Comments