पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2022 pdf / पोलीस भरती जुन्या प्रश्नपत्रिका

 पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2022 pdf  पोलीस भरती जुन्या प्रश्नपत्रिका old Question papers Police bharti


नमस्कार मित्रांनो नुकतीच राज्यात मेगा Maharashtra police bharti २०२२ निघालेली आहे. आणि पोलीस भरतीसाठी काही महत्वाचे प्रश्न मी टाकत आहे. मागील परीक्षेत हे प्रश्न विचारले गेले आहेत. चालक पोलीस भरती, राज्य राखीव पोलीस बल आणि चालक पोलीस भरती यामध्ये हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत. 


1. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात?

 उत्तर दोन


2. बाष्प यंत्राचा शोध कोणी लावला ?

उत्तर जेम्स वॅट


3. मेरी झाशी नही दूँगी!! अशी घोषणा कोणी केली होती? उत्तर राणी लक्ष्मीबाई


4. सोडियम क्लोराइड यास मराठीत काय म्हणतात ?

उत्तर मीठ


5. होमगार्ड या दलाची स्थापना मुंबईत केव्हा करण्यात आली ?

उत्तर 1946


6. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली

उत्तर 1993


7. राज्य राखीव बलाची स्थापना केव्हा झाली ?

उत्तर 19488. सर्कशीतला विदूषकाने प्रेक्षकांना हसविले .प्रयोग ओळखा?

उत्तर सकर्मक भावे


9. लता मंगेशकर पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली?

उत्तर 1984


10. विवाहात या शब्दाची विभक्ती ओळखा?

उत्तर सप्तमी


11. गेटवे ऑफ इंडिया कधी बांधण्यात आले?

उत्तर 1911


12. खालीलपैकी पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर 21 आक्टोबर


13. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला?

उत्तर थॉमस जेफरसन 


14. बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

उत्तर भिंगारा.
15. कोल्हापूर, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यात कोणत्या खनिजाचे साठे आहेत?

उत्तर. बॉक्साईड


16. महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते?

उत्तर लोकराज्य


17. अभिनेते श्रीराम लागू यांनी लिहिलेले आत्मचरित्र कोणते?

उत्तर. लमाण


18. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात रेल्वे डबे निर्मिती कारखाना उभारण्यास केंद्राने मंजुरी प्रदान केली?

उत्तर लातूर


19. तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे आहे?

उत्तर. तहसीलदार


20. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?

उत्तर. जिनिव्हा

Post a Comment

0 Comments