आधुनिक भारताचा इतिहास- 50 प्रश्न व उत्तर
लॉर्ड कॅनिंग ने कोणती परीक्षा भारतात सुरू केली?
उत्तर- इंडियन सिविल सर्विस
मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर हमीद दलवाई
बॉम्बे मिल हॅन्ड असोसिएशनची स्थापना कोणी केली?
उत्तर- एन. एम. लोखंडे
सामाजिक परिषद कोणी सुरू केली ?
उत्तर- न्यायमूर्ती रानडे
पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक कोण होते?
उत्तर- ग.वा. जोशी
हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी ही संस्था कोणी स्थापन केली ?
उत्तर - भगतसिंग व चंद्रशेखर आजाद
हिंदू मेळा या संघटनेची स्थापना कोणी केली?
उत्तर - नवगोपाळ मित्र
कोणाच्या “आझाद दस्ता” या संघटनेने ब्रिटिशांना दे माय धरणी ठाय करून सोडले होते?
उत्तर- भाई कोतवाल
लाहोर येथे “दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज” ची स्थापना करणारे कोण होते?
उत्तर- लाला हंसराज
1938 मध्ये कोणाच्या पुढाकाराने हैदराबाद स्टेट काँग्रेस ची स्थापना झाली?
उत्तर- स्वामी रामानंद तीर्थ
कोलकाता येथे बेथन यांच्या पुढाकाराने मुलींसाठी पहिली शाळा कधी स्थापन झाली ?
उत्तर- 1848 रोजी
विधवा विवाहाला कधी कायदेशीर मान्यता मिळाली ?
उत्तर - इसवी सन 1856 रोजी
मुस्लिम अँग्लो ओरिएंटल कॉलेज ची स्थापना कोणी केली?
उत्तर - सर सय्यद अहमद खान (1875 अलिगड)
1857 मध्ये मुंबईत मराठी नाटकासाठी पहिले नाट्यगृह कोणी बांधले ?
उत्तर- नाना शंकर शेठ
सदाचार हाच खरा धर्म आहे ही शिकवण कोणी दिली ?
उत्तर- श्री नारायण गुरु
विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी कोणी पद्धतशीर प्रयत्न केले ?
उत्तर- पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर
विधवा पुनर्विवाह पुरस्कार करून स्वतः विधवेशी विवाह करणारे कोण होते?
उत्तर - विष्णुशास्त्री पंडित
फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कोण होते ?
उत्तर - वामन शिवराम आपटे
पार्लमेंटची मागणी करणारे दोन समाजसुधारक कोण?
उत्तर - राजा राम मोहन रॉय व लोकहितवादी
थोर समाजसेविका अनंतशास्त्री डोंगरे यांच्या कन्या व बिपीन बिहारी बोस यांच्या पत्नी कोण ?
उत्तर - पंडिता रमाबाई
आर्य समाजाने हिंदू धर्मातून अन्य धर्मात गेलेल्यासाठी कोणती मोहीम सुरू केली?
ऊत्तर- शुद्धीकरण चळवळ
जनसंघाचे संस्थापक कोण?
उत्तर - श्यामाप्रसाद मुखर्जी
वाई येथे प्राज्ञपाठशाळा ची स्थापना कोणी केली?
उत्तर- ब्रह्मभूत केवलानंद सरस्वती
मुंबई प्रांतात रयतवारी व महालवारी पद्धतीची सांगड घालून महसूल व्यवस्था निर्माण करणारा गव्हर्नर कोण?
उत्तर - लॉर्ड एलफिस्टन
“ज्यांना बाटायचे नसेल त्यांनी माझा कित्ता गिरवावा” हे उद्गार कोणाचे आहेत ?
उत्तर- मंगल पांडे
“मी सत्ता मानत नसल्याने मी बंड केले” असे म्हणताच येत नाही हे उद्गार कोणाचे आहेत ?
उत्तर- तात्या टोपे
कोणाची तुलना मोगल कारकीर्दीतील औरंगजेबाशी केली जाते ?
उत्तर- लोर्ड कर्जन
सायमन कमिशनची नेमणूक झाली त्यावेळी भारतातील व्हाईसरॉय कोण होते ?
उत्तर - लॉर्ड आयर्विन
ऑगस्ट ऑफर म्हणून ओळखली जाणारी घोषणा 8 ऑगस्ट 1940 रोजी कोणी केली?
उत्तर- लॉर्ड लीनलीथगो
लोकमान्य टिळकांनी कोणते दोन उत्सव सुरू केले होते ?
उत्तर- सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती
बालकामगारांच्या संरक्षणासाठी फॅक्टरी ॲक्ट कोणाच्या कारकिर्दीत प्रथम पास करण्यात आला?
उत्तर - लॉर्ड रिपन
इल्बर्ट बिल विधेयक कोणत्या बाबीशी संबंधित होते ?
उत्तर - न्यायव्यवस्थेतील काळा-गोरा भेद रद्द करणे
लोकसेवा आयोगाची स्थापना कोणी केली?
उत्तर- लॉर्ड डफरीन
1947 मध्ये भारत व पाकिस्तान या दोन राष्ट्रांच्या निर्मितीची 2 जून योजना कोणी तयार केली?
उत्तर- लॉर्ड माउंट बॅटन
1830 ते 1833 अशी तीन वर्षे राजा राम मोहन राय यांनी मुघल बादशहाचे दूत म्हणून कोठे काम केले?
उत्तर- इंग्लंड या ठिकाणी
प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहेत ?
उत्तर- आत्माराम पांडुरंग, डॉक्टर भांडारकर, व न्यायमूर्ती रानडे
1927 यावर्षी संस्थानामधील प्रज्ञा परिषदांना एकत्र आणणारी अखिल भारतीय संस्थांनी प्रजा परिषद स्थापन करणारे नेते कोण?
उत्तर - बलवंतराय मेहता व मणिलाल कोठारी
1933 मध्ये पाकिस्तान नेशनल मोमेंट ही संघटना कोणी स्थापन केली ?
उत्तर- रहमत अली चौधरी
1936 यावर्षी स्वामी सहजानंद यांच्या प्रेरणेने कोणती संघटना स्थापन झाली ?
उत्तर -अखिल भारतीय किसान सभा
“इंडियन नॅशनल ट्रेड युनियन” ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
उत्तर - 1947
“रॉयल एशियाटिक सोसायटी” ची स्थापना कोणी केली?
उत्तर- विल्यम जोन्स
“दाभाडी प्रबंध” हे धोरणविषयक निवेदन कोणत्या पक्षाशी संबंधित आहे?
उत्तर- शेतकरी कामगार पक्ष
प्रथम वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली तर दुसरे सत्याग्रही म्हणून कोण आहेत?
उत्तर- पंडित जवाहरलाल नेहरू
“करा किंवा मरा” ही घोषणा कोणी दिली?
उत्तर- महात्मा गांधी
इंग्लंडने भारतासहित आपण दुसऱ्या महायुद्धात उतरत असल्याचे कधी जाहीर केले ?
उत्तर - 3 सप्टेंबर 1939
लोकमान्य टिळकांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षाचा तुरुंगवास कोणत्या तुरुंगात भोगला?
उत्तर- मंडाले (म्यानमार)
दक्षिण आफ्रिकेत गांधीजीनी कोणते आश्रम उभे केले?
उत्तर- फीनिक्स आश्रम व टॉल्स्टॉय फार्म
1929 मधील राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनात संमत करण्यात आलेला ठराव कोणता?
उत्तर - पूर्ण स्वराज्याचा ठराव
1932 नंतर गांधीजींनी कोणता आश्रम स्थापन केला ?
उत्तर- वर्धा येथे सेवाग्राम आश्रम
गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
उत्तर - सरोजिनी नायडू
सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान भारतातील चिघळत चाललेली परिस्थिती पाहून ब्रिटिश सरकारने कोणती घोषणा केली?
उत्तर- गोलमेज परिषद घेण्याची
महात्मा गांधीजींनी “यंग इंडिया” चे नाव बदलून कोणते नाव ठेवले?
उत्तर - हरिजन
हैदराबाद संस्थानातील वंदेमातरम आंदोलनाचे नेते कोण होते?
उत्तर - गोविंदभाई श्रॉफ
हे पण प्रश्न एकदा वाचा - 50 MCQ Question & answer Covid 19
2 Comments
666
ReplyDeleteKrushna
DeleteThanks for comment..